आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारांची नोंद:जिल्ह्यात पंधरवड्यात होणार बेरोजगारांची नोंद : पालकमंत्री; सरकारी यंत्रणा रोजगारासाठी सहाय्य करणार

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल ) ते महाराष्ट्र दिन (१ मे) या कालावधीत जिल्ह्यात गावागावात विविध यंत्रणांमार्फत पोहोचून गावातच बेरोजगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. या नोंदणीद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे रोजगाराची आवश्यकता व युवक युवतींमधील कौशल्य यांची सांगड घालून युवक युवतींना रोजगार मिळवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करावे,असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी दिले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शेतकरी सदन येथे बेरोजगार नोंदणी पंधरवाडा राबवण्यासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली.

बैठकीस उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. याबैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत गावागावात जाऊन बेरोजगार युवक युवतींची नोंदणी करणार आहे. आपल्या गावातच करा रोजगार नोंदणी, हा उपक्रम राबवणार आहे. या नोंदणी उपक्रमातून कोणताही गरजू बेरोजगार युवक युवती वंचित राहता कामा नये, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले.

अशी होणार नोंदणी

  • उपक्रमाद्वारे सुमारे ७५ हजार युवक युवतींची नोंदणी होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक युवक युवतीकडून एक नमुना भरण्यात येणार असून, त्यात त्यांना आवश्यक रोजगाराचे स्वरुप व त्यानुसार त्यांना करावयाचे मार्गदर्शन यात विभागणी करण्यात येणार आहे.
  • स्वयंरोजगाराची आवड असलेल्या युवक युवतींना उद्योग व्यवसायांबाबत माहिती व प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे व अन्य आवश्यक मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...