आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकाची कारवाई:विनापरवाना स्फोटक, जिलेटीन डिटोनेटर्स पोलिसांनी केले जप्त ; पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दगडपारवा जवळून एका टॅक्टर्सवर अवैधरित्या विनापरवाना स्फोटक, ज्वलनलशील पदार्थ जिलेटिन डिटोनेटर्स जप्त केले. ही कारवाई बुधवारी १५ जूनला करण्यात आली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली, त्या माहितीच्या आधारे पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दगडपारवा रोडवर विना नंबरचा ट्रॅक्टर अडवला. त्या ट्रॅक्टरच्या मागे कॉम्प्रेसर पंप फिड करुन त्यात जिलेटिन व डिटोनेटर्स दिसून आले. ही अवैधरित्या वाहतूक व वापर करण्याची कोणतीही परवानगी नसताना ते स्फोटक पदार्थाचा वापर करणार होते. या वेळी पोलिसांनी मिठू कल्याणजी नाईक ४३, रा. मसूदा राजस्थान, दुर्गेश कुमार नाईक ३२ रा. मसूदा राजस्थान ह.मु. बार्शीटाकळी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा लाख रूपये किंमतीचा ट्रॅक्टर, त्यामध्ये ८ जिलेटिन कांडया, ८ डिटोनेटर्स , एक कॉम्प्रेसर मशीन, ५० फूट कॉम्प्रेसर पाइप, इलेक्ट्रिक केबल वायर, असा सात लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या दोन्ही आरोपी विरुद्ध बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात एक्स्प्लोझवि्ह अॅक्ट कलम, ५, ९, भादंवि कलम २८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली. विशेष म्हणजे मंगळवारी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बाळापूर शहरातील वजीराबाद परिसरातून आरोपी शेख करीम उर्फ कल्लू पहेलवान शेख रहीम याच्या घरातून ४ प्राणघातक शस्त्र ६ मोठे चाकू असे १० शस्त्र जप्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...