आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळ वारं:अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी, झाडांच्या फांद्या तुटल्या, रस्त्यावरही साचले पाणी, नाल्या तुडुंब

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहराच्या जवळपास सर्वच भागात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज (शुक्रवार) अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी-वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही भागात झाडांच्या फांद्या तुटल्या तर रस्त्यावरही पाणी साचले होते. तसेच लहान नाल्या तुडुंब भरुन वाहात होत्या.

जानेवारी महिन्या पासून अवकाळी पावसाची हजेरी सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अकोला जिल्ह्यात ७ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. या अंदाजानुसार शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह वादळी वारेही होते.

दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहराच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार काही भागात हलका पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या शहराच्या विविध मार्गावर कचरा विखुरला होता. जुने शहरातील गोडबोले प्लॉट भागात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या समोर एका कडुलिंबाचे झाड तुटले. तर बसस्थानक ते पोस्ट ऑफीस या मार्गादरम्यान रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते. त्याच बरोबर शहरातील लहान नाल्या ओंसडून वाहात होत्या.

विद्युत प्रवाह खंडीत

जुने शहराच्या विविध भागात तसेच माळी पुरा परिसरात विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने विजेवर चालणारे व्यवसाय ठप्प झाले होते तर नागरिक त्रस्त झाले होते. महावितरणच्या वतीने मान्सुनपूर्व झाड कटाईचे काम अद्याप सुरु केलेले नाही. हे काम महावितरणने पावसाळ्यापूर्वी सुरु करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.