आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक-व्यापाऱ्यांची धांदल:अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले; वेचलेला कापूस घरी नेण्यासाठी धावपळ

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत काही िदवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच बुधवारी सायंकाळी अकाेला शहरासह ग्रामीण भागात काही िठकाणी पाऊस झाला. अचानक पावसाच्या सरी काेसळण्यास सुरुवात झाल्याने शेतात साेंगून ठेवलेला कापूस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

काही िदवसापासून िजल्ह्यातील वातावरणात दिवसभरात अचानक बदल हाेत आहे. सकाळी थंडी तर दुपारी गर्मी व ढगाळ वातावरण हाेते. कर्नाटक-केरळ किनारपट्टीवर ठळक कमी दाबाचे क्षेत्र तथा चक्राकार वारे आहेत. तसेच अंदमान समुद्रात चक्राकार वारे वाहण्यास प्रारंभ झाले. दरम्यान बुधवारी सायंकाळी ग्रामीण भागात पावसाच्या सरी काेसळल्या. ७.३० वाजताच्या सुमारास अकाेल्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. उमरी राेड, गाैरक्षण राेडसह अनेक िठकाणी पावसाचे आगमन झाले.

बातम्या आणखी आहेत...