आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात बुधवारी १८७ िठकाणी उपसरपंचपदाच्या निवडीची प्रक्रिया झाली. उर्वरित ठिकाणी शुक्रवारी ६ जानेवारीला निवडणूक हाेणार आहे. जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गत आठवड्यात जाहीर झाला हाेता. २५८ ठिकाणच्या सरपंचपदाचे निकाल जाहीर करण्यात आले. सदस्यांच्या १४७४ जागांचे निकाल जाहीर केले . एकूण ५७१ सदस्य हे बनिविरोध झाले हाेते. २९ ठिकाणी एकही अर्ज आला नव्हता. बनिविरोध प्रभागांची संख्या १३८ हाेती. उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील सभा ४ जानेवारीला झाली. या निवडणूक प्रक्रियेसाठी चार ठिकाणी अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.
येथे झाली प्रक्रिया ः बुधवारी ४ जानेवारी १८७ िठकाणची उपसरपंचपदाची निवडणूक झाली. त्यात पातूर तालुक्यात -१४, बाळापूर-२६, तेल्हारा-२३, बार्शीटाकळी-३४, अकोट -३७, अकोला-२७, मूर्तिजापूर तालुक्यात २६ ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ६ जानेवारीला ७८ ग्रा.प.मध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक हाेणार आहे. यात पातूर-१३, बार्शीटाकळी-१३, अकोला-२६, मूर्तिजापूर तालुक्यातील २६ ठिकाणांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.