आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाफकिनकडे औषधांची मागणी करूनही वेळेत औषधे उपलब्ध होत नसल्याने शासकीय वैदयकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला इतर शासकीय संस्थांकडे औषधांची मागणी करावी लागत आहे. जवळच्या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जवळचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून औषधांची उपलब्धता करून ‘सर्वोपचार’चा कारभार चालत आहे. अवघ्या साडेआठ महिन्यात उसनवारीवर घेतलेल्या औषधांची रक्कम तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांवर पोहोचली आहे. ‘जीएमसी’मध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत ही बाब उघड झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. लगतच्या जिल्ह्यातून अकोल्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात लागणारा ऑक्सजिन, औषधे, इतर सर्जिकल साहित्याची मागणीही दरवर्षी वाढत आहे. वाढत्या मागणीनुसार प्राप्त होणारे अनुदानही वाढवणे आवश्यक आहे. असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र त्यानुसार निधी आणि पुरवठा होत नसल्याचे समोर येते. एप्रिल महिन्यात हाफकिनकडे औषधांची मागणी केली होती. मात्र पुरवठा न झाल्याने उसनवारीवर औषधे खरेदी करण्याची वेळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.