आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:गोवर संसर्ग रोखण्यासाठी बालकांचे लसीकरण करा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या विविध भागात गोवरचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असून संसर्ग रोखण्यासाठी राहिलेले लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. जिल्ह्यातून ४० हून अधिक रुग्ण संदिग्ध आढळले असून त्यांच्यात ताप आणि अंगावर पुरळ आढळून आली होती.

गोवर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात गोवर-रुबेला लसीकरण बाकी असलेल्या बालकांचे लसीकरण त्वरित करून घ्यावे. त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. ०-५ वयोगटातील बालकांची लसीकरण सत्रनिहाय यादी अद्ययावत करावी. यादीनुसार वंचित बालकांचे लसीकरण नियमित सत्रात किंवा अधिक सत्र घेऊन करावे.

अधिकच्या सत्राचे आयोजन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याप्रमाणे व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही करावे, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. याशिवाय जीवनसत्व अ पूरक मात्रा सविस्तर मार्गदर्शक सूचनेनुसार देण्यात यावी. कुपोषित बालकांमध्ये गोवरची गुंतागुंत होऊन ते त्यांच्या जीवावर बेतू शकते, हे लक्षात घेऊन आपल्या भागातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्व अ चा डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी लसीकरणाबाबत जागृत रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आरोग्य सेविकेला माहिती द्यावी
बालकांच्या रोग प्रतिकारशक्तीसाठी जीवनसत्व अ चा डोस आवश्यक आहे. या डोसची मात्रा घेतल्यानंतर गोवर झाला तरी लक्षणे अगदी सौम्य असतील. याशिवाय बालकाला तापीसह अंगावर पुरळ असेल, तर जवळच्या आरोग्य सेविकेला त्याची माहिती द्यावी.
- डॉ. विनोद करंजीकर, माता व बाल संगोपन अधिकारी, अकोला.

बातम्या आणखी आहेत...