आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाैरक्षण संस्थानच्या बाजूला असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून, या अर्धवट रस्त्याचे अकाली निधन झाल्याचे म्हणत वंचित बहुजन युवा आघाडीने साेमवारी अभिनव आंदोलन केले. रस्त्याच्या अकाली निधनावर शोकसभा घेत वंचितने भाजपवर निशाणा साधला. ७०० मीटरच्या रस्त्यावर ५९० खड्डे असून, ३१ मार्चपर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास रस्त्याचे श्राद्ध घालण्यात येईल, असा इशारा वंचितने दिला.
गाैरक्षण राेडवरील गाैरक्षण संस्थाच्या परिसरातील रस्त्याचा काही भाग तयार करण्यात आला. उर्वरित राेडची दुरावस्था कायम असून, वंचित बहुजन युवा आघाडीच्या महानगर पूर्व आणि पश्चिमच्यावतीने आंदोलन करण्यात आला. एका वर्षातच मरण पावल्याने मेलेल्या रस्त्यासाठी "श्रद्धांजली सभा" आयोजित करण्यात आली होती. प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार, माजी महापाैर, माजी नगरसेिवकांवर िटका करण्यात आली.
असे केले आंदोलन
वंचित बहुजन पूर्व पश्चिम युवा आघाडीचे कार्यकर्ते पांढरे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले. मोठ्या ७०० फुटाच्या रस्त्यावर ५९० खड्डे मोजून त्यांना चुन्याचे मार्किंग करण्यात आले. त्यानंतर अकाली मरण पावलेल्या ह्या रस्त्याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. ३१ मार्च २०२३ पर्यंत हा रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्यास गौरक्षण रस्त्यासाठी श्रध्दा घालण्याचा कार्यक्रम मनापा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निमंत्रित करून आयोजित करू असा इशारा देण्यात आला.
आंदाेलनात जिल्हाध्यक्ष श्रीकांत माणिकराव घोगरे, जय तायडे, महानगरध्यक्ष आशीष मांगुलकर, कुणाल राऊत, माजी नगरसेविका किरण बोरखडे, सुवर्णा जाधव , मनोहर पंजवानी, विकास सदांशिव , नितीन सपकाळ , दादाराव पवार, ॲड. प्रशिक मोरे, संतोष गवई, नितीन वानखडे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, आशीष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी,आदित्य इंगळे, प्रकाश ढोकणे, करण पलासपागर, प्रतीक थंकेकर आदी कार्यकर्ते सहगाभी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.