आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:आरोग्य विभागामार्फत कर्णबधीर‎ सप्ताहात विविध कार्यक्रम‎

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा‎ आरोग्य विभाग अकोला संयुक्त सहकार्याने ८‎ मार्चपर्यंत जागतिक कर्णबधीर सप्ताह साजरा‎ करण्यात येत आहे. १ मार्चला जिल्हा शल्य‎ चिकित्सक कार्यालयात नियोजन सभा‎ आयोजित केली होती.‎ या सभेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.‎ तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.‎ सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य‎ अधिकारी डॉ. पवार, माता बाल संगोपन‎ अधिकारी डॉ. विनोद करंदीकर, निवासी‎ वैद्यकिय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, डॉ.‎ धनंजय चिमनकर आदींची या वेळी उपस्थिती‎ होती. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयील‎ कान-नाक-घसा तज्ज्ञांव्दारे आरोग्य विभागातील‎ अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कानाच्या‎ आजाराविषयी कार्यशाळा घेण्यात आली. २‎ तारखेला जिल्हा स्त्री रुग्णालयात जागतिक‎ कर्णबधीर 4 सप्ताहाचे उद्घाटन केले.

या वेळी‎ मान्यवर अधिकाऱ्यांसह अधीक्षक डॉ. आरती‎ कुलवाल, डॉ. वंदना वसो, डॉ. असलम, डॉ.‎ फाळके आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.‎ रामू नागे यांनी केले. या कार्यक्रमात ४० कर्णबधीर‎ रुग्णांची डॉ. नेहा आठवले, डॉ. स्वप्नील गरडे‎ यांनी तपासणी केली. रुग्णालयातील परिचर्या‎ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी मुलींची कानाच्या‎ विविध आजाराविषयी कार्यशाळा घेण्यात‎ आली. शुक्रवारी, ३ मार्चला जागतिक कर्णबधीर‎ दिनानिमित्त आरोग्य विभागामार्फत शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालय येथून सकाळी ८ वाजता‎ जनजागृती फेरी काढण्यात आली. वरीष्ठ‎ वैद्यकीय अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा फेरीमध्ये‎ सहभाग होता. या फेरीत वैद्यकीय महाविद्यालय‎ व विविध नर्सिंग महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा‎ सहभाग होता. ८ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...