आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात पक्षी सप्ताहनिमित्त कार्यक्रमांची रेलचेल:वन विभागाकडून विविध कार्यक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनविभागाच्या वतीने 5 ते 12 नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अकोला वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव विभाग यांनी मिळून विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाह उपवनसंरक्षक अर्जूना के. आर यांनी केले आहे.

असे आहे कार्यक्रमाचे नियोजन

शनिवार 5 रोजी वन्यजीव अभ्यासक साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस आहे. 12 नोव्हेंबर रोजी पक्षी अभ्यासक डॉ. सलिम अली यांची जयंती आहे. या पार्श्वभुमिवर 5 ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ते याप्रमाणे-

  • शनिवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता प्रभात फेरी वन विभागाचे विभागीय कार्यालय ते टॉवर चौक- दुर्गा चौक- आकाशवाणी चौक – पुन्हा परत विभागीय कार्यालय व मारुती चित्तमपल्ली यांच्या कार्याची ओळख.
  • रविवार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00 वाजता काटेपूर्णा अभयारण्य, माळराजुरा तलाव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर येथे पक्षी निरीक्षण व गणना.
  • सोमवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वा. वनविद्या महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे अकोला जिल्ह्यातील पक्षी याविषयावर सादरीकरण
  • मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वा. पत्रकार भवन अकोला येथे पत्रकारांसाठी पक्षी निरीक्षण कार्यशाळा
  • बुधवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर येथे पक्षी निरीक्षण
  • गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी चौंढी तलाव परिसर आलेगाव परिक्षेत्र येथे पक्षी निरीक्षण व गणना
  • शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00 वाजता कापशी तलाव, मच्छी तलाव, आखतवाडा, काटेपूर्णा तलाव, माळराजुरा तलाव, चौंढी तलाव परिसरात स्वच्छता मोहिम
  • शनिवार 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान वाशिंबा येथे पक्षी सप्ताह समारोप व डॉ. सलिम अली यांच्या कार्याची ओळख.
बातम्या आणखी आहेत...