आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने सरासरी ओलांडली:तिवसा तालुक्यामध्ये धुव्वाधार पावसामुळे वरखेड गाव जलमय ; शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी

तिवसाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पावसाने चांगलेच थैमान घातले असून रविवारी पुन्हा काही दिवसांची उसंत दिल्यानंतर चौथ्यांदा पावसाने धुव्वाधार बॅटिंग करीत तिवसा तालुका जलमय करून सोडला आहे.यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून नुकसानीचा फटका बसला आहे.

तिवसा तालुक्यात पावसाने पूर्वीच सरासरी ओलांडली असतांना काही दिवस उसंत देत पावसाची हजेरी होत आहे.गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील नागरिक प्रचंड उकाड्यामुळे हैराण झाले असतांना आज 4 सप्टेंबरच्या पहाटे पासून जवळपास 6 तास अखंडित पाऊस कोसळला.यात तालुक्यातील वरखेड गावात मोठ्या प्रमाणात पावसाने बॅटिंग केल्याने पुरतं गाव जलमय झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.गावातील रस्त्याने चक्क पुराचे स्वरूप आले होते.त्याचप्रमाणे दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने शेतकरी वर्ग आहे त्या पिकाला जगविण्यासाठी फवारणीच्या कामी लागला असताना आजच्या पावसाने फवारणीच्या खर्चावरही पाणी फेरले. यावर्षीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून सरासरी उत्पन्नात मोठी घट निर्माण होत असल्याचे दिसून येत असल्याने याची शासनाने नोंद घेवून तिवसा तालुका ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी होऊ घातली आहे.

बातम्या आणखी आहेत...