आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता:तीन दिवस काही ठिकाणी होऊ शकतो मुसळधार पाऊस

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 6 ते 9 सप्टेंबर या कालावधित हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तर तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार 6 सप्टेंबरला विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दिनांक 07,08,09 सप्टेंबर या कालावधीत हलक्या ते मध्यम पावसासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यात ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरच्या प्रारंभी पावसात खंड पडला. प्रारंभीच्या काळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी गेल्या दोन आठवड्यात वारंवार बदललेले वातावरण आणि तीव्र उन्हासह उकाडा जाणवला. शिवाय अनेक भागात रिमरिम पाऊस वगळता पावसाची विश्रांती दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण पावसाळ्यातील सरासरी 595.3 मिलीमीटर पाऊस अपेक्षि असतो. त्यापैकी 536.3 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झाला आहे. एकूण वार्षिक सरासरीचा विचार केल्यास जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधित 693.7 मिलीमीटर पाऊस होतो. त्यापैकी 77.3 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील पावसाची स्थिती

अकोट : 73.2 %

तेल्हारा : 99.8 %

बाळापूर : 118.5 %

पातूर : 76.7 %

अकोला : 99.1 %

बार्शीटाकळी : 86.6 %

मूर्तिजापूर : 79.8 %

एकूण जिल्हा : 90.1 %

अकोला, बुलढाणा जिल्ह्यात प्रतिक्षा

अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र सूर्यप्रकाश राहत असल्याने पिकांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या असून, सोयाबीन व कपाशीच्या पिकांना पाणी देण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात पाऊस झाल्यास पिकांना दिलास मिळेल.

बातम्या आणखी आहेत...