आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीदार पश्चिम विदर्भ:मागील पाच वर्षाच्या तुलनेने यंदा सर्वाधिक जलसाठा उलब्ध; रब्बीला मोठा दिलासा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भात मागील पाच वर्षाच्या तुलनेने यावर्षी सर्वाधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर २०१७ साली सर्वाधिक कमी जलसाठा उपलब्ध झाला होता. यावर्षी साठवण क्षमतेच्या ८३.८४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून, अद्याप पावसाची हजेरी सुरू असल्याने या साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात एकूण ९ मोठे २७ मध्यम तर २७५ लघु असे एकुण ३११ जल प्रकल्प आहेत. या जलप्रकल्पांमुळे ३१०८.७७ दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. यावर्षी आता पर्यंत २६०६.३३ दशलक्ष घनमिटर (८३.८४ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे.

सिंचनाची सोय

२०१७ पासून २५ डिसेंबरला हा सर्वाधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भातील अनेक शहरे, गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार असून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. अद्याप पावसाळा थांबलेला नाही. मागील दोन वर्षाचा अनुभव लक्षात घेता ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत पाऊस होतो. त्यामुळे पश्चिम विदर्भातील धरणात १०० टक्के जलसाठा उपलब्ध होवू शकतो.

अमरावतीत सर्वाधिक जलसाठा

टक्केवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात साठवण क्षमतेच्या ८६.९२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, दशलक्ष घनमीटरमध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. अमरावती जिल्ह्यात १ मोठा, ७ मध्यम तर ५६ लघु असे एकूण ५४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे १०२७.११ दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता उपलब्ध झाली आहे. तूर्तास ८५०.३४ दलघमी (८२.७९टक्के) साठा उपलब्ध आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात ३ मोठे, ६ मध्यम,९५ लघु प्रकल्प आहेत. यामुळे ९१२.५३ दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली असून तूर्तास ७९३.१८ दलघमी (८६.९२ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर सर्वात कमी वाशिम जिल्ह्यात साठवण क्षमतेच्या २९८.०७ दलघमी (८३.५४ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे.

पाच वर्षातील २५ डिसेंबर रोजीचा जलसाठा

- २५ डिसेंबर २०१७ - ८६९.३७ दलघमी

- २५ डिसेंबर २०१८ - १७९४.६७ दलघमी

- २५ डिसेंबर २०१९- १३९६.४८ दलघमी

- २५ डिसेंबर २०२० - २३८०.३३ दलघमी

- २५ डिसेंबर २०२१ - २१४४.९५ दलघमी

बातम्या आणखी आहेत...