आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौजदारी शॉक, जाहिरातदारांचे धाबे दणाणले:विद्युत खांब, रोहित्रावरील बॅनरबाजी भोवणार, महावितरणकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वीज खांब, वीज रोहित्रे यावर खाजगी जाहिरातदारांकडून होत असलेल्या बॅनरबाजीमुळे सुरळीत वीज पुरवठ्याला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत जाहिरातदारांनी पोस्टर्स, बॅनर, फलके काढले नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा महािवतरण कंपनीकडून देण्यात आला. फाैजदारी शाॅक बसणार असल्याचे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

तांत्रिक दोषामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरण कपंनीच्या कर्मचाऱ्यांना दिवसालाच नाहीतर रात्रीही वीज खांबावर चढावे लागते. रोहित्रातील बिघाड शोधून ते दुरूस्त करावे लागतात. परंतु खाजगी जाहिरातदारांच्या बॅनरबाजीमुळे महावितरणच्या दुरूस्ती कार्यातच अडथळा निर्माण होतो आहे. एवढेच नाही तर, अनेक ठिकाणी बॅनरमुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे निर्दशनास आले आहे.

..तरीही सुधारणा हाेईना

विद्युत खांब, रोहित्रांवर बॅनरबाजी झाल्याने 2020 मध्ये सुमारे 18 जाहिरातदारांवर महावितरण कंपनीकडून गुन्हा नोंदविण्यात आला होता. परिणामी वीज यंत्रणेवरील जाहिराती थांबल्या होत्या. मात्र शहरातील रोहित्रे व वीज खांबावरील बॅनरबाजी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे 15 जानेवारीनंतर वीज यंत्रणेवर बॅनरबाजी आढळल्यास जाहिरातदारावर महावितरणकडून गुन्हे नोंदविण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.

कर्मचारी झाले जखमी

रोहित्रासाठी वापरलेले दोन पोल किंवा अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन खांबावर बांधलेले बॅनर हवेच्या दबावामुळे एका बाजूने फाटतात. नंतर बॅनर वीज वाहिन्यात अडथळा निर्माण करतात.तसेच अनेक पोलवर लावलेल्या पोस्टर व फलकामुळे त्या पोलवर कर्मचाऱ्यांना चढता येत नाही. पोस्टरबाजीमुळे कर्मचारी पोलवरून पडून गंभीर जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत.

ही खबरदारी घेण्याची मागणी

जिल्ह्यात काही ठिकाणी विद्युत खांब व अन्य विद्युत साहित्यांवर झाडांच्या फाद्या आहेत. अनेकदा जोराने हवा सुटल्याने या फाद्या विद्यूत वाहिनीवर पडतात. परिणामी विद्युत पुरवठा खंडीत होता. ही समस्या सर्वाधिक पावसाळ्यात निर्माण होते. त्यामुळे महावितरण कंपनीकडून या फाद्या तोडण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...