आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय महाराष्ट्र:ठाकरेंच्या शिवसेनेला विजय मालोकारांचा जय महाराष्ट्र

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना प्रणीत ‘महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. यासोबतच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांना पाठवला आहे. विजय मालोकार यांनी शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...