आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:मूर्तिजापूर येथे आदर्श शिक्षक पुरस्काराने विलास खाडे सन्मानित

मूर्तिजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदर्श कन्या विद्यालय व कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दर पाच वर्षांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील गुणांच्या आधारे आदर्श शिक्षकाची निवड करण्यात येते. यावर्षी गौरव प्राप्त करणारे आदर्श शिक्षक विलास शेषराव खाडे यांना मुख्याध्यापिका सुवर्णा राजेंद्र गावंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

आर्थिक दुर्बल घटक राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती २०२१-२२ परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल तसेच शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याबद्दल श्रेया दशरथ महानुर वर्ग ८ या विद्यार्थिनीचा तिच्या पालकांसमवेत सत्कार घेण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक या सर्वांचे स्वागत करण्यात आले. नंतर विद्यार्थिनींनी स्वयंअद्यापनाच्या वर्गाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे शिक्षकांच्या वेशभूषेत असलेले चिमुकले, वेशभूषामध्ये विशेष सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या वेशभूषेने सर्वांची मने जिंकली.

बातम्या आणखी आहेत...