आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:पाणी याेजनेच्या स्थगितीविरुद्ध आज ग्रामस्थांचा एल्गार‎

अकाेला‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर व अकाेला तालुक्यातील‎ खारपाणपट्ट्यातील गावांसाठी वरदान‎ ठरणाऱ्या शिवसेना (उद्धव ठाकरे)‎ आग्रही असलेल्या ६९ गाव प्रादेशिक‎ पाणीपुरवठा याेजनेला‎ शिंदे-फडणवीस सरकारकडून‎ स्थगिती दिल्याच्या विराेधात‎ मंगळवारी ग्रामस्थ आंदाेलन करणार‎ आहेत.‎ शिवसेनेच्या नेतृत्वात हाेणाऱ्या‎ आंदाेलनात २ हजारांपेक्षा जास्त‎ ग्रामस्थ सहभागी हाेण्याचा दावा केला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. िजल्हाधिकारी कार्यालयासमाेर‎ हाेणाऱ्या या आंदाेलनासाठी ४ हजार‎ चाैरस फुटाचे २० मंडप टाकले आहेत.‎

दरवर्षी बाळापूर व अकाेला तालुक्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणीटंचाई िनर्माण हाेत असल्याने‎ बाळापूर तालुक्यातील ५३ व अकोला‎ तालुक्यातील १६ गावे अशा ६९‎ गावांसाठी जल जीवन मिशनअंतर्गत‎ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना‎ प्रस्तावित केली.

यासाठी तत्कालीन‎ ठाकरे सरकारच्या काळात शिवसेनेचे‎ आमदार िनतीन देशमुख, िज.प. गटनेते‎ गाेपाल दातकर यांच्यासह या दाेन्ही‎ तालुक्यातील िज.प.-पं.स सदस्यांच्या‎ उपस्थितीत मंत्रालयात बैठका झाल्या‎ हाेत्या. त्यानंतर तत्कालीन ठाकरे‎ सरकारच्या काळात या याेजनेला सर्व‎ मान्यता प्रदान करून िनधीही मंजूर‎ केला. मात्र आता उपमुख्यमंत्री‎ फडणवीस पालकमंत्री असल्यानंतरही‎ त्यांनी याेजना स्थगित ठेवण्याचा‎ आदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...