आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:‘नो वर्क नो पे’चे उल्लंघन; शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा, शोधासाठी परभणीचे पोलिस पथक अकोल्यात दाखल झाले

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुचिता आनंद पाटेकर यांच्याविरुद्ध परभणी येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नो वर्क नो पे आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्यासह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिस पाटेकर यांचा शोध घेत असल्याने गुरुवारी त्या नॉट रिचेबल होत्या. तर परभणी पोलिस अकोल्यात त्यांच्या शोधासाठी आले.

डॉ. पाटेकर या परभणी येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी असतानाचे हे प्रकरण आहे. शासनाची ७४ लाख ९० हजार ४९६ रुपयांची फसवणूक झाल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना अभिजित वाहूळ, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता आनंद पाटेकर, मुख्याध्यापिका खायमखानी शहनाज बानो, सिद्दिकी मो. शरफोद्दीन मो. फैयजोद्दीन, शबाना बेगम खुर्शीद अली यांनी शासन निधीचा अपहार केल्याची तक्रार कारमेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव मो. मुश्ताक अहेमद मो. अली यांनी केली होती.