आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावणी - यवतमाळ रोडवर बिनधास्त मोटार वाहन कायद्याची पायमल्ली करीत धावणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सवर कारवाई करा, या मागणीसाठी नवाज शरीफ कादिर शरीफ या तरुणाने दि. ४ एप्रिलपासून उपोषण सुरु केले आहे. . आता हे आंदोलन तीव्र होत आहे. यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना ही या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बेकायदेशीर ही वाहतूक सुरू आहे.
परंतु या ट्रॅव्हल चालकावर कार्यवाही होत नव्हती. ही बेकायदा वाहतूक बंद करा अशी मागणी जोर धरत होती. या सामाजिक हिताची दखल घेत शहरातील मुस्लिम तरुण नवाज शरीफ हा पवित्र रमजान महिन्यातील रोजा करीत ४ एप्रिलपासून उपोषणाला बसला आहे. आ. बोदकुरावर यांनी उपोषण मंडपाला भेट देत कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस व परिवहन विभागाला दिले. तरीही ही वाहतूक सुरू आहे. आता हे उपोषण उग्र रूप धारण करायला लागले आहे. या आंदोलनाला भारतीय कॉमुनिष्ट पक्षाने जाहीर पाठिंबा देत आंदोलनाचा इशारा दिला होता.
तर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहराचे नगराध्यक्ष तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते डॉ. मनीष मस्की, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, माजी पं. स. सदस्य अरविंद वखनोर, काँग्रेसचे रवी पोटे, अंकुश माफुर, यांनी उपोषण मंडपाला भेट देत जाहीर पाठिंबा घोषीत केला. मुजोर ट्रॅव्हल चालक ऐकत नसेल तर वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा या वेळेस देण्यात आला. हा प्रश्न जर लवकर मार्गी लागला नाही तर तालुक्यातील जनतेचा वाढता पाठींबा लक्षात घेता हे आंदोलन चिघळण्याची भीती जनमानसात बोलली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.