आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक नियमांचे उल्लंघन:पासष्ट हजार चालकांकडून  वाहतूक नियमांचे उल्लंघन

अकाेला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत पाेलिसांनी ६५ हजार ६०४ वाहन चालकांना ई-चालानद्वारे कारवाई केली. मात्र त्यांच्याकडे ५ काेटी ६० लाख ८ हजार ५५० रुपयांचा दंड थकल्याचे समाेर आले आहे. हा दंड १३ ऑगस्टला हाेणाऱ्या लाेकअदालीच्या माध्यमातून भरता येणार असून, यासाठी पाेलिस दलाकडून संबंधितांना समन्सही बाजवण्यात आले आहेत.

वाहन चालवताना माेबाइल फाेन हाताळणे, िट्रपल सीट प्रवास करणे, ट्राफिक सिंग्नलचे उल्लंघन करणे आदी प्रकार अनेक वाहन चालकांकडून सर्रासपणे हाेतात. अनेकदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना राेखण्याचा प्रयत्न करतात. मात्र चालक पळून जाताे. अशी वेळी पाेलिस वाहचाना क्रमांक नाेंदवतात. दरम्यान वाहन चालकांकडे दंड थकला असून, संबंधितांना मोबाइल फाेनवर सूचनाही देण्यात आली आहे.

हे प्रकार बंद केव्हा हाेणार : वाहनाला डुप्लिकेट सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या दुचाकीस्वारांकडून धुमाकूळ घालण्यात येत आहे. याबाबत वाहतूक शाखेला तक्रार झाल्यानंतर पाेलिसांनी कारवाईला प्रारंभ केला हाेता. फटाके फोडणारे सायलेन्सर बसवल्याने काही दिवसांपूर्वी पाेलिसांनी १८ दुचाकी जप्त केल्या हाेत्या. मात्र तरीही हुल्लडबाजी थांबत नसल्याचे दिसून येत आहे. चालकांनी शासन निमयानुसारच वाहनांना सायलेन्सर, हाॅर्न लावावा; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाेलिसांनी दिला आहे.

आतापर्यंत १ लाख २९ हजार केसेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे पाेलिसांनी आतापर्यंत ६५ हजार ६०४ वाहना चालकांवर एकूण १ लाख २८हजार ३५१ केसेस केल्या आहेत. त्यांच्याकडे ई-चालान दंड प्रलंबित असून, त्यांना १३ आॅगस्टला हाेणाऱ्या लोकअदालतमध्ये हजर राहून दंडाचा भरणा करता येणार आहे. अथवा १२ आॅगस्ट पूर्वी वाहतूक पाेलिसांकडेही दंड जमा करता येणार आहे. दंडाबाबतची सूचना संबंधित वाहनधारकांच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठवण्यात आली आहे. या एसएमएसवरील लिंकद्वारे अथवा महाट्रॅफीक अॅप द्वारेही भरता येतो.

बातम्या आणखी आहेत...