आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला विदर्भ त्रिशक्ती महोत्सव समितीच्या वतीने खाटू नरेश यांच्या सुरजगढ निशान पदयात्रेचे महानगरात आगमन होत असून या निमित्ताने महानगरात निशान यात्रा व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ त्रिशक्ती महोत्सवाची निशान यात्रा बुधवारी ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता राणी सती धाम येथून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा मनपा चौक, गांधी चौक, जुने कापड बाजार, तिलक रोड, सिटी कोतवाली, खोलेश्वर मार्गे अनिकट, लक्झरी स्टँड मार्गे गीता नगर येथील रामदेवबाबा श्यामबाबा मंदिरात पोहोचणार आहे.
यात महिला पुरुष भक्त मनोकामना निशान व मनोकामना सिगडी ज्योत, सुरजगढ येथील मनोकामना सिगडी सोबत सहभागी होऊन तब्बल ५५१ निशान यात राहणार आहेत. या यात्रेत विशेष करून बाबा श्याम यांच्या रिंगस वरून खाटूधाम धाम येथे दोन वेळा नित्य निशान अर्पण करणारी आरती दीदी सहभागी होणार आहे. या उत्सवात खाटू श्याम धाम मंदिरचे पुजारी श्यामसिंह चौहान, सुरजगड दरबारचे भगत हजारीमल इंदूरिया, जीनमाता मंदिरचे पुजारी राधेश्याम पराशर, मनीष पराशर व पांढरीधामचे महंत नरेश बाबा यांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी ४ वाजता रामदेवबाबा श्यामबाबा मंदिरात राष्ट्रीय भजनकारांची भव्य भजन संध्या होणार आहे. या उत्सवात श्याम बाबाचा दरबार सजविण्यात येऊन त्यात अखंड ज्योत व सुहासीक अत्तर वर्षा करण्यात येणार आहे.
या आगळ्यावेगळ्या निशान यात्रेत सहभागी होण्यासाठी भक्तानी समितीचे कमलकिशोर अग्रवाल, मनीष सुरेका, गोपाल शर्मा हारे, महेश राठी, निलेश राठी तेल्हारा, अमित नागवान, प्रतीक भारूका मूर्तिजापूर, पवन गुप्ता, प्रतीक झुनझुनवाला अकोट, निलेश अग्रवाल, योगेश अग्रवाल शेगाव, आशिष सुरेका, मोहन नागवणी खामगाव, दीपक अग्रवाल, प्रवीण अग्रवाल मेहकर, आशीष शर्मा यवतमाळ, सुमित बबेरवाल, गौरव वर्मा वर्धा, अमोल भूत, धनंजय भूत चांदुर रेल्वे, मनोज व्यास, रितेश गुप्ता धामणगाव समवेत रामदेवबाबा -श्यामबाबा सेवा समितीचे दीपक गोयनका, ओमप्रकाश गोयनका, गजेंद्र सारडा, महेंद्र खेतान, डॉ. सत्यनारायण खोरीया, राजू शर्मा बालाजी, विनोद टोरका समवेत विदर्भ त्रिशक्ती महोत्सव समिती, रामदेवबाबा श्यामबाबा सेवा समिती तथा विप्र युवा वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.