आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही:विश्व वारकरी सेनेच्या गणेश महाराज शेटेंचा इशारा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरूषांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी शपथ घ्यायला, हवी असे आवाहन विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी एका कीर्तनातून केले आहे.

राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटणे सुरूच आहे. कधी क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुलेंवरील वक्तव्यामुळे तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुंवर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल वादात अडकले हाेते. दरम्यान आता राज्यपालांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वारकऱ्यांमधूनही िनिषेधाचे सूर उमटत आहे. अकाेला जिल्ह्यातील वाडेगाव येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदाियक पारायण व अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात हभप गणेश महाराज शेटे यांनी राज्यपालांवर भाष्य केले.

अपमान सहन हाेणार नाहीच

महाराष्ट्रात काेणीही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद बाेलणाऱ्यांचा निषेध केला पािहजे. राज्यपाल भगतसिंह काेशारी आपला जावई आहे काय, असा सवाल करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर महारापुरुषांबाबत वादग्रस्त बाेलणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी शपथ घ्यायला हवी, असेही हभप गणेश महाराज शेटे कीर्तनात म्हणाले.

सुषमा अंधारे यांनी लेखी माफी मागावी

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मातील देव, देवी संत, महंतांच्या बद्दल पातळी सोडून बोलण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असून यावरही हभप गणेश महाराज यांनी कीर्तनातून भाष्य केले. आज ठाेकर मारायची व उद्या माफि मागायची, असे चालणार नाही. अंधारे यांनी लेखीच माफि मागावी. हा महाराष्ट्र संतांचा, शूरवीरांचा आहे. संत, महापुरुषांचा आदरच व्हायला हवा, असेही महाराज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...