आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा भेट:अनाथ निराधारांची मेळाव्यास भेट, ‘गिव्ह विंग्ज फाउंडेशन’चा पुढाकार

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनाथ, अपंग, निराधार यांना समाजातील प्रत्येक घटकासारखे जगता यावे यासाठी गिव्ह विंग्ज चॅरिटेबल फाउंडेशनच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरातील मेळाव्यामध्ये बालगृहातील ९० मुला-मुलींच्या भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायत्री बालिकाश्रम, सर्वोदय बालगृहातील मुलांनी मेळाव्यामध्ये उत्साहात सहभाग घेतला. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलिस निरीक्षक विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुला-मुलींनी मेळाव्यातील पाळणाघर, आकाश पाळणा, ब्रेकडान्स, गोल चक्री, मिकी माउस, ड्रॅगन ट्रेन, भूत बंगला, जम्पिंग जमपाक, चिल्ड्रन वॉटर बोटिंग यावर आपला आनंद शोधला.

बातम्या आणखी आहेत...