आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरी:विठ्ठल, महाकाली मंदिरात चाेरीस;  दोन्ही मंदिरातील दानपेटी

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोठी उमरी परिसरातील विठ्ठल मंदिर व महाकाली मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडून चोरून नेल्या. दोन्ही घटना मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास घडल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला आहे. सिव्हील लाइन्स पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

रात्री २ च्या दरम्यान शहरातील मोठी परिसरातील असलेल्या विठ्ठल मंदिर अन् महाकाली मंदिरात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी या दोन्ही मंदिरातील दानपेटी फोडली. लोकांनी दान केलेले काही पैसे जमा झाले होते ते पैसे घेऊन चोरटे पसार झाले.

गुरुवारी सकाळी मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी हात साफ केल्याचे निदर्शनास येताच घटनेची माहिती सिव्हिल पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार भानुप्रताप मडावी हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहाेचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्या फुटेजमध्ये चोरटे दिसत आहेत. यापूर्वीही गजानन महाराज मंदिरातील कळस चोरट्यांनी चोरून नेला होता. तसेच दानपेटी चोरीच्या घटना घडल्या आहेत. जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी सहा दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याचे उघड झाले होते.

बातम्या आणखी आहेत...