आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:मूर्तिजापुरात विवेकानंद विचार मंच‎ व्याख्यानमाला 10 जानेवारीपासून‎

मूर्तिजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त‎ दरवर्षी होणाऱ्या तीन दिवसीय व्याख्यानमालेस‎ मंगळवार १० जानेवारीपासून सुरुवात होत असून‎ येथील तिडके नगरातील राधा मंगलम्‎ सभागृहात दररोज सायं.७ वा. विविध‎ विषयांवरील व्याख्याने होणार आहेत. १०‎ जानेवारीला तुळजापूर येथील सुप्रसिद्ध वक्ते व‎ विचारवंत प्रा. दादासाहेब जाधव यांचे ''''देव,देश‎ आणि धर्म'''' या विषयावर तर बुधवार‎ ११जानेवारीला नागपूर येथील सुप्रसिद्ध वक्त्या व‎ समुपदेशक मिरा कडबे यांचे केवळ महिला व‎ शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनींकरीता‎ ''''करीअर वुईथ कॅरेक्टर'''' या विषयावर त्यांचे‎ व्याख्यान होणार आहे.

प्रश्नोत्तराच्या माध्यमातून‎ त्या महिला व तरुणींशी संवाद साधतील गुरुवार‎ १२ जानेवारीला सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार व‎ कलावंत गजानन घोंगडे यांचा आबाल वृद्धांना‎ खळखळून हसविणार विनोदी कार्यक्रम ''''गंमत‎ जंमत'''' होणार आहे. सर्व व्याख्याने व कार्यक्रम‎ नियोजित वेळेवरच सुरु होणार असल्याने‎ वेळेपूर्वी कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे असे‎ आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...