आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात मतदानाला आधार जोडणी शिबीर:मतदारांनी शिबिराचा लाभ घ्यावा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवारी, 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर होणार आहे. तरी जिल्ह्यातील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

मतदान प्रक्रिया सुयोग्य होणार

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम १ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदविले गेले किंवा कसे, याचा पडताळा करण्यासाठी याची मदत होणार आहे.

अशी आहे प्रक्रिया

विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक 'सहा ब'मध्ये आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावयाचा आहे. तसेच व्होटर हेल्प लाईन ऍप व https://nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे ही मतदार आपला आधार क्रमांक नोंदवू शकतात.

जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर उपक्रम

मतदारांना आधार क्रमांक मतदार ओळखपत्र सोबत संलग्न करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हजर असतील. सर्व मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

अवैध मतदानावर चाप

नजिकच्या भविष्यात अकोल्यात मनपा आण जिल्हास्तरीय काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे जिल्हयात पारदर्शन निवडणूक प्रक्रिया संपन्न व्हावी, या दृष्टीने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदान कार्डाला आधार कार्ड जोडणीमुळे अन्य मतदार संघात किंवा एका पेक्षा दोन मतदार संघातील मतदान कार्ड असल्यास त्यांवर चाप बसणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुयोग्य होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...