आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा कार्यक्रम घोषित:वाशीममधील 55 ग्रामपंचायतींच्या‎ पाेटनिवडणुकीसाठी 18 ला मतदान‎

वाशीम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाने ३१ डिसेंबर‎ २०२२ पर्यंत विविध कारणामुळे रिक्त‎ झालेल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंचाच्या‎ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला‎ आहे. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या‎ एकूण ९२ सदस्यांसाठी, तसेच पाच रिक्त‎ सरपंचपदासाठी येत्या १८ मे रोजी मतदान‎ प्रक्रिया होणार आहे.‎ यात वाशीम तालुक्यातील ११‎ ग्रामपंचायतींचा समावेश असून ग्रामपंचायत‎ सदस्यांची २९ रिक्त पदे रिक्त आहे.‎ मालेगांव तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या‎ सदस्यांची दहा जागा रिक्त आहेत. तर‎ सरपंचपद एक रिक्त आहे.

रिसोड‎ तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या ६‎ सदस्यांसाठी, मंगरुळपीर तालुक्यातील ९‎ ग्रामपंचायतींच्या ११ सदस्यांसाठी, तर एक‎ सरपंचपद रिक्त आहे. कारंजा तालुक्यातील‎ ११ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या १५, तर‎ सरपंचाची एक जागा रिक्त आहे. मानोरा‎ तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या २१‎ सदस्यांसाठी, तर सरपंच पदाच्या दाेन‎ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम घोषित‎ केला आहे.‎ १८ एप्रिल रोजी तहसीलदार‎ निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २५‎ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत सुट्टीचे‎ दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या‎ कालावधीत नामनिर्देशपत्रे सादर करणे.

३‎ मे रोजी सकाळी अकरापासून अर्जाची‎ छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. ८ मे रोजी‎ दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची अंतिम‎ मुदत आहे. त्याचदिवशी दुपारी तीननंतर‎ निवडणूक चिन्ह वाटप करुन निवडणूक‎ लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी‎ प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ मे रोजी‎ सकाळी साडेसातपासून सायंकाळी‎ साडेपाचपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार‎ आहे. १९ मे रोजी मतमोजणी करुन निकाल‎ जाहीर करण्यात येणार आहे.‎