आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सज्ज:ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी हाेणाऱ्या मतदानासाठी शनिवारी दुपारी संबंधित अधिकारी-कर्मचारी हे मतदान प्रक्रियेसाठी आप आपल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. निवडणुकीत एकूण १,७३२ जागांसाठी ४,८०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ३ लाख ७,६४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण ८२६ मतदान केंद्र उभारली असून, १७९ केंद्र संवेदनशील म्हणून घाेषित केली आहेत. निवडणुकीसाठी ३,८६७ कर्मचारी कार्यरत आहेत. गत दाेन वर्षे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी निर्बंध हाेते. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेतल्या. त्यानंतर रविवारी मतदान हाेणार असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

असे आहेत उमेदवार : ग्रा.पं. निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी व उमेदवारी माघारीनंतर जिल्ह्यात आता तेल्हारा तालुक्यात २३, अकोट ः ३६, मूर्तिजापूर ः ५१, अकोला ः ५४, बाळापूर ः २६, बार्शीटाकळी ः ४७ तर पातूर ः२८ अशा एकूण २६५ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे. यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज ६७९ असून, त्यातून १,४७४ सदस्यांची निवड हाेणार आहे.

५७१ सदस्य हे बिनविरोध
ग्रा.पं.निवडणुकीत एकूण ५७१ सदस्य हे बिनविरोध झाले आहेत. २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झाला नव्हता. जिल्ह्यात एकूण बिनविरोध प्रभागांची संख्या १३८ आहे. सरपंच वगळता ५ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा-१, अकोट-१, अकोला-३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सरपंचपदासाठी २५८ ठिकाणी निवडणूक
सरपंचपदासाठी २५८ जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध ठरले असून, चार ठिकाणी सरपंचपदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही.

या ग्रा.प. बिनविराेध
बिनविरोध सरपंच ठरलेल्या ग्रा.पंमध्ये हिंगणी खुर्द ता. तेल्हारा, धामणगाव व अकोली जहांगीर ता. अकोट, उमरी (ता. मूर्तिजापूर) चा समावेश आहे. सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त न झालेल्या ग्रा.पं.मध्ये बांबर्डा ता. अकोट,भौरद ता. अकोला, परंडा ता. बार्शीटाकळी, गोंधळवाडी( ता. पातूर.) चा समावेश आहे. धामणगाव ता. अकोट ही एकमेव ग्रामपंचायत संपूर्ण बिनविरोध(सरपंच व सदस्य) झाली आहे.

असे आहेत मतदार
ग्राम पंचायत निवडणुकीत एकूण ३ लाख ७,६४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १ लाख ५८ हजार ८३० पुरुष तर १ लाख ४८,८०५ महिला व ५ इतर मतदारांचा समावेश आहे.
तालुका मतदार संख्या
तेल्हारा ३०८३५
अकोट ५२०७९
मूर्तिजापूर ५८३०४
अकोला ५६९४२
बाळापूर २७१८५
बार्शीटाकळी ४८३३२
पातूर ३३९६३
संवेदनशील मतदान केंद्र
तालुका मतदान केंद्र
तेल्हारा ०७
अकोट- ४२
मूर्तिजापूर ५१
अकोला ०९
बाळापूर १२
बार्शीटाकळी ३३
पातूर २५
अशी आहे यंत्रणा कार्यरत
१)निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ३८७६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
२)मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४२९३ मनुष्यबळ संख्या उपलब्ध करण्यात आली आहे.
३)मतदान पथकांची संख्या ९६९ असून, मतदान केंद्रांवर ८२७ पथके कार्यरत आहेत. राखीव संख्या १३१ आहेत.

बातम्या आणखी आहेत...