आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकरण:जिल्हा परिषद अध्यक्षांचे मात्र वेट अँड वॉच; चौकशीच्या ठरावावर विभागीय आयुक्तांनी मागितले उत्तर

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने अकोला गटविकास अधिकारी (बीडीओ) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत- डिसीईओ) यांच्या िवभागीय चौकशीचे ठराव विधिसंमत नसून, ते निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव जि.प.ने विभागीय आयुक्तांना सादर केल्यानंतर आयुक्त कार्यालयाने अध्यक्षांना उत्तर मागितले. मात्र अद्याप हे उत्तर सादर करण्यात आलेल नाही. पुढील महिन्यात अध्यक्षांचा कार्यकाळ संपत असल्याने उत्तर पाठवण्याच्या मुद्दावर लक्ष घातले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेची विशेष सभा २३ मार्च २०२२ रोजी झाली होती. त्यात अकोला पं.स.चे बीडीओ राहुल शेळके, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांच्याविरुद्ध गैरवर्तणुकीप्रकरणी विभागीय चौकशीचा ठराव सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडून मंजूर केला होता. मात्र त्याला प्रशासन व महािवकास आघाडीने विरोध केला होता. मात्र तरीही ठराव मंजूर घेतल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी सभात्याग केला होता.

वादाला अशी राजकीय किनार
अकोल्याचे तत्कालीन बिडीओ राहुल शेळकेंवर असभ्य वागणुकीचा आरोप करीत चौकशीचा ठराव घेण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका सदस्येचा पती हा पं.स.मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्याला प्रशासनाकडून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्याची सोयीच्या ठिकाणी पदस्थापना करण्यात यावी, यासाठी पं.सं. प्रशासनावर दबाव टाकण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...