आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्य:निवडणुकीत प्रभाग तीन की चार सदस्यांचा

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई तत्काळ सुरू करावी, असे आदेश नगर विकास विभागाच्या वतीने महापालिकेला देण्यात आले. मात्र निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग की चार सदस्यांचा? याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. तसेच प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश हे निवडणूक विभागाकडून येणे अपेक्षित असताना शासनाने असे आदेश पाठवल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मनपाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली. त्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात मनपा निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम पुढे ढकलल्या गेले. या दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडीने एकल सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा निर्णय घेतला. हा निर्णय बदलून तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. या दरम्यान इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. या दरम्यान एका प्रभागातून तीन सदस्य या नुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली. यावर आक्षेप घेऊन सुनावणीही घेण्यात आली. ओबीसी सोडून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानंतर ओबीसींचा निर्णय झाल्याने पुन्हा सोडत घ्यावी लागली. आता निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे दिसत असताना राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस गटाचे सरकार आले.

काय कारवाई करावी?
नगर विकास विभागाने तत्काळ कारवाई सुरू करावी, असे आदेश दिले आहेत. पण नेमकी कोणती कारवाई करावी, असा प्रश्न अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तसेच प्रभाग रचनेबाबतचे आदेश निवडणूक विभागाकडून आल्या नंतरच कारवाईला प्रारंभ केला जातो. मात्र हा आदेश नगर विकास विभागाने दिल्याने संभ्रमात भर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...