आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत पाणीपट्टीचा भरणा न केल्यास नळजोडणी तोडणार:महापालिका पाणीपुरवठा विभागाचा इशारा; कोट्यवधीची पाणीपट्टी थकीत

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या नळजोडणी धारकांकडे पाणीपट्टी थकीत आहे. त्या नळधारकांनी थकीत पाणीपट्टीचा भरणा त्वरित करावा. अन्यथा कोणतीही पूर्व सुचना न देता, नळजोडणी तोडण्यात येईल, असा इशारा महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

वेतनाची रुळावर आलेली गाडी घसरणार

महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गाडी रुळावर आणली आहे. त्याच बरोबर अन्य थकबाकीही दिली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सप्टेंबर महिन्याचे वेतन देण्यात आले. त्यामुळे आता ऑक्टोबरचे वेतनही सातव्या वेतन आयोगानुसार करावे लागणार आहे. आता दरमहा 12 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा वेतनावर खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे वसुली न झाल्यास वेतनाची रुळावर आलेली गाडी घसरणार आहे. त्यामुळेच प्रशासनाने थकीत मालमत्ता कर, थकीत पाणीपट्टी वसुलीकडे मोर्चा वळवला आहे.

आयुक्तांनी दिले आदेश

प्रत्येक विभाग प्रमुखांनी थकीत कराची वसुली करावी, असे आदेश आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले आहेत. त्यामुळेच ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकलेला आहे, त्यांच्या मालमत्तांना सिल लावण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. तर आता थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पाणीपट्टी वसुलीसाठी पाणी पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. ज्या नागरिकांनी थकीत पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही, त्यांनी त्वरित थकीत पाणीपट्टीचा भरणा करावा अन्यथा कोणतीही पूर्व सुचना न देता नळजोडणी तोडण्याचा इशारा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला आहे.

नळजोडणी शोध मोहीम सुरू होण्याची शक्यता

तसेच ज्या नागरिकांना अधिक पाणीपट्टीची रक्कम आली असेल त्यांनी महापालिकेच्या नेहरु पार्क चौकातील कार्यालय अथवा महापालिका मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागात संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. दरम्यान 30 सप्टेंबर पर्यंत अभय योजनेत अवैध नळजोडणी 400 रुपयात वैध करता येणार होती. त्यामुळे थकीत पाणीपट्टी वसुली सोबतच अवैध नळजोडणी शोध मोहिमही सुरु होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र अद्यापही शहराच्या अनेक भागात तीन ते साडेतीन वर्षापासून पाणीपट्टीचे देयक नागरिकांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे या नागरिकांना एकाच वेळी तीन ते चार वर्षाचा पाणीपट्टीचा भरणा करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...