आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना‎:अवकाळी पावसाचा इशारा;‎ शेतकऱ्यांनी घेतली धास्ती‎

अकोला5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रादेशिक हवामान विभागाकडून‎ जिल्ह्यात शनिवार १८ मार्चपर्यंत‎ विजांच्या कडकडाटासह‎ अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला‎ आहे. या संदर्भात सतर्कतेचा इशारा‎ मंगळवारी १४ मार्चला जारी झाला.‎ दरम्यान या संदर्भात‎ देण्यात आलेल्या माहिती‎ नुसार विजांचा कडकडाट,‎ अतिवृष्टी आणि गुरुवार १६ मार्च ते‎ शनिवार १८ मार्चदरम्यान ताशी ३० ते‎ ४० किलाेमीटर वेगाने वारे‎ वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात‎ आली आहे. या कालावधीत‎ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या‎ शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी‎ खबरदारी घ्यावी.

शेतमाल सुरक्षित‎ ठिकाणी साठवावा. कृषी उत्पन्न‎ बाजार समितीतही विक्रीसाठी‎ आणलेला माल सुरक्षित ठेवावा.‎ मालाचे नुकसान होणार नाही, याची‎ काळजी घ्यावी. विजा व गारांपासून‎ बचाव करावा. सुरक्षित ठिकाणी‎ आश्रय घ्यावा, अशा सूचना‎ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या‎ आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित‎ केल्या आहेत. या सूचनांचे पालन‎ करावे, असे आवाहन‎ जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...