आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रलंबित मागण्या कालबद्ध पद्धतीने पूर्ण हाेत नसल्याने जिल्हा परिषद नर्सेस संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास 20 जूनपासून आंदाेलन छेडण्यात येणार आहे. हे आंदाेलन तीव्र झाल्यास त्याचा परिणाम रुग्णसेवर हाेण्याची शक्यात आहे. यापूर्वी संघटनेने आराेग्य मंत्री डाॅ. राजेश टाेपे यांची भेट घेतली हाेती. मात्र त्यानंतरही ताेडगा न िनघाल्याने आता पुन्हा आंदाेलन छेडण्याचा इशारी दिला आहे.
उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डाटा एंट्री ऑपरेटर नेमण्यात यावेत, आरोग्य सेविकेच्या नावाने आलेले उपकेंद्रस्तरावरील अनमोल टॅब परत करण्याबाबत मागणी पूर्ण करावी, यासह अन्य मागण्यांबाबत नर्सेस संघटनेने 27 ऑक्टाेबर राेजी कामबंदचे हत्यार उपसले हाेते. प्रशासनाने मागण्यांबाबत आश्वासन दिले. मात्र आश्वासन पूर्ण न केल्याचा आराेप संघटनेने केला.
आंदाेनलाला आठ महिने उलटल्यानंतरही मागण्या मंजूर झाल्या नाहीत. त्यामुळे याबाबत तोडगा काढावा; अन्यथा येणाऱ्या दिवसांत संघटना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा नर्सेस संघटनांनी पालकमंत्री बच्चू यांना सादर केलेल्या िनवेदनात िदला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा संगीता जाधव, सल्लागार समितीच्या विजयकर, दुर्गा पवार, खवले, सुनीता वानखडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.