आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीचा रुबरु उपक्रम:नाल्या- मोकळ्या जागांचा रखडलेल्या विकासकामांवर झाली चर्चा; अकोला शहरात समस्याच समस्या

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठीने सुरु केलेल्या रुबरु या उपक्रमाला 7 ऑगस्ट रोजी नागरिकांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रभाग क्रमांक 29 मधील नागरिकांनी उपस्थिती लावली.नागरिकांनी बलोदे-लेआऊट, बाजोरीया नगरी, आरोग्य नगर, उन्नती नगर, लहरिया नगर, बंजारा नगर, आनंद नगर, ख्रिश्चन कॉलनी, हिंगणा रोड आदी विविध भागातील समस्या तसेच प्रश्न उपस्थितांसमोर मांडले.

नागरिकांचे सामान्य प्रश्न या उपक्रमातून सुटावेत, या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 19 जूनपासून हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. आता पर्यत सहा उपक्रम राबविण्यात आले. तर सातवा उपक्रम बलोदे ले-आऊट भागातील संत गजानन महाराज मंदिर परिसरात पार पडला.

विकासकामांवर झाली चर्चा

प्रभाग क्रमांक 29 मधील नाल्यांचे रखडलेले काम, रस्त्याची रखडलेली कामे, मोकळ्या जागांचा विकास, साचलेले पाणी तसेच अनेक भागातील रस्त्याची झालेली दुरावस्ता आदींबाबत विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. त्याच बरोबर नगरसेवक हाकेला धावून येतात आणि सहकार्य करतात, याबाबत नागरिकांनी नगरसेवकांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभागृह नेत्या योगिता पावसाळे, माजी स्थायी समिती सभापती संजय बडोणे, माजी नगरसेवक धनंजय धबाले, माजी नगरसेविका मंगला सोनोने यांनी समस्या समजून घेतल्या नंतर आपली भूमिका मांडत या समस्या मार्गी लावण्याचे तसेच मोठ्या प्रमाणात प्रभागात विकास कामे करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विशेषत: महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. दिव्य मराठीने रुबरुच्या माध्यमातून व्यासपिठ उपलब्ध करुन दिल्या बद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...