आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा:पश्चिम विदर्भातील 3 मोठया, तर 13 मध्यम प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू

प्रतिनिधी । अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील २७ पैकी १३ मध्यम प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात एकाच दिवसात २४.०५ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे. दरम्यान, ३ मोठ्या प्रकल्पांतूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पश्चिम विदर्भात एकूण २७ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे ७६५.०३ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तुर्तास जोरदार पाऊस होत असल्याने प्रकल्पात ५२६.७८ दशलक्ष घनमीटर (६८.८६ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. पाटबंधारे विभागाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पात किती जलसाठा ठेवता येतो? याचा मापदंड केला आहे. या मापदंडामुळे मध्यम प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. या दरवाज्यातून कोट्यावधी लिटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मध्यम प्रकल्पांतून विसर्ग

अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव. वाशिम जिल्ह्यातील अडाण. बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी, उतावळी या मध्यम प्रकल्पांतून विसर्ग सुरु आहे.

काही प्रकल्प ठरले अपवाद

विशेष म्हणजे गर्गा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा पाणीसाठा अद्याप जिवंत साठ्यापर्यंत आला नाही. तर बोर्डी नाल्यात १ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे.

बातम्या आणखी आहेत...