आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची आवक मंदावली:पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्पांचे दरवाजे केले बंद, मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ एकातून विसर्ग सुरू

प्रतिनिधी । अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील जल प्रकल्पांतील पाण्याची आवक मंदावली आहे. अनेक प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ एका प्रकल्पातून विसर्ग सुरु आहे.

गर्गा प्रकल्प अद्याप कोरडाच

पश्चिम विदर्भात ९ मोठे, २७ मध्यम, २७५ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे ३१०८.७७ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने विविध प्रकल्पांत मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे मोठे, मध्यम प्रकल्पांचे दरवाजे वारंवार उघडावे लागले होते. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे प्रश्चिम विदर्भातील जल प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही. तसेच, प्रकल्पांचे दरवाजे बंद करावे लागले.

गर्गा प्रकल्प कोरडाच

यापूर्वी मध्यम प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ बेंबळा, अकोला जिल्ह्यातील वान, काटेपूर्णा, बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी आदी प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले होते. तुर्तास बेंबळा प्रकल्पातून विसर्ग सुरु आहे. तसेच, मध्यम प्रकल्पांपैकी शहानूर, चंद्रभागा, सपन या प्रकल्पांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तुर्तास १२ मध्यम प्रकल्पांतून कमी प्रमाणात विसर्ग सुरु आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील गर्गा प्रकल्पाने अद्यापही जिवंत साठा पाहिलेला नाही. हा प्रकल्प कोरडाच आहे. तुर्तास साठवण क्षमतेच्या २३११.४८ दशलक्ष घनमीटर (७४.३५ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे.

मोठ्या प्रकल्पातील जलसाठा

- ऊर्ध्व वर्धा - ४७५.४१ दलघमी

- पूस - ८३.१५ दलघमी

- अरुणावती - १२२.५२ दलघमी

- बेंबळा - १०३.१९ दलघमी

- काटेपूर्णा - ७२.३५ दलघमी

- वान - ५५.७५ दलघमी

- नळगंगा - ३४.६६ दलघमी

- पेनटाकळी - ४४.४८ दलघमी

- खडकपूर्णा - ७०.५८ दलघमी

बातम्या आणखी आहेत...