आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी फुटली, काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत:नॅशनल हायवेकडून घेतला जाणार दुरुस्तीचा खर्च

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक वाटिकाजवळ उड्डाणपुलाच्या लॅडींग खाली 350 मिमी आकाराची जलवाहिनी फुटली. यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला नसला, तरी काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचा खर्च नॅशनल हायवे कडून घेतला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

नेहरु पार्क चौकात महापालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभातून 350 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी अशोक वाटिकेतून जेल चौकाकडे जाते. अशोक वाटिका चौकातुन उड्डाण पूल जातो. अशोट वाटिका चौैकातुन मूर्तिजापूर मार्गाकडे उड्डाणपुलाची लॅडींग आहे. या लॅडींगच्या खाली बहुधा पुलाचे काम करताना ही जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली असावी. मात्र, अनेक दिवस या जलवाहिनीतून पाण्याची गळती झाली नाही. परंतु आता गेल्या काही दिवसापासून पाण्याची गळती सुरु आहे. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर साचते. हा रस्ता डांबरी आहे. त्यामुळे रस्ता नादुरुस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जलवाहिनी उड्डाण पुलाच्या लॅडींगखाली फुटल्याने जलवाहिनी दुरुस्त कशी करावी?असा प्रश्न पाणी पुरवठा विभागासमोर उपस्थित झाला होता. या अनुषंगाने महापालिकेने नॅशनल हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम नॅशनल हायवे विभागाकडून केले जाणार आहे. यासाठी येणारा खर्चही नॅशनल हायवे विभागच करणार आहे. परंतु तो पर्यंत काही भागाचा पाणी पुरवठा हा विस्कळीत राहणार आहे.

काही भागांचा पाणीपुरवठा विसकळीत

अशोक वाटिका चौकातून गेलेली 350 मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी जेल चौकात जाते. या जलवाहिनीला पुढे 300 मिमी, 200 मिमी आणि अखेरीस 110 मिमी जलवाहिन्या जोडलेल्या आहेत. या जलवाहिनीतून दक्षता नगर, पोलिस क्वार्टर, कैलास टेकडी, निमवाडी, पोलिस हेडक्वार्टर्स आदी भागाला पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नेहरु पार्क जलकुंभातून ज्या-ज्या वेळी पाणी पुरवठा केला जातो. त्या-त्या वेळी या जलवाहिनीतून पाण्याची गळती होते. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

बातम्या आणखी आहेत...