आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन महिन्यापासून जलवाहिनी फुटलेली:दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यात झाला खड्डा, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

प्रतिनिधी । अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक वाटिकेजवळ उड्डाणपुलाखाली मागील साडेतीन महिन्यांपासून जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे दर 3 दिवसाआड पाण्याचा अपव्यय होतो. तसेच, उड्डाणपुलाखाली लँडींगजवळ मोठा खड्डा झाल्याने अपघाताचीही भीती आहे.

अशोक वाटिकेजवळ उड्डाणपुलाच्या लॅडींगखाली ३५० मिमी आकाराची जलवाहिनी फुटली. यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला नसला तरी काही भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचा खर्च नॅशनल हायवे कडून घेतला जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.

मात्र, साडेतीन महिने लोटूनही जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. नेहरु पार्क चौकात महापालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभातून ३५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी अशोक वाटिकेतून जेल चौकाकडे जाते. अशोक वाटिका चौकातुन उड्डाण पुल जातो. अशोट वाटिका चौैकातुन मूर्तिजापूर मार्गाकडे उड्डाणपुलाची लॅडींग आहे. या लॅडींगच्या खाली बहुधा पुलाचे काम करताना ही जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली असावी. गेल्या साडेतीन महिन्यापासून पाण्याची गळती सुरु आहे. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर साचते. हा रस्ता डांबरी आहे. दर तीन दिवसाआड पाण्याची गळती होत असल्याने डांबर वाहुन गेले असून या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा

अशोक वाटिका चौकातून गेलेली ३५० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी जेल चौकात जाते. या जलवाहिनीला पुढे ३०० मिमी, २०० मिमी आणि अखेरीस ११० मिमी जलवाहिन्या जोडलेल्या आहेत. या जलवाहिनीतून दक्षता नगर, पोलिस क्वार्टर, कैलास टेकडी, निमवाडी, पोलिस हेडक्वार्टर्स आदी भागाला पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नेहरु पार्क जलकुंभातून ज्या-ज्या वेळी पाणी पुरवठा केला जातो. त्या-त्या वेळी या जलवाहिनीतून पाण्याची गळती होते. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

बातम्या आणखी आहेत...