आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने उडवली दाणादाण:अकोल्यात अनेक भागात साचले पाणी; वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात 27 जून रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शहरातील पार्वती नगर, नरेंद्र नगर, संत कबीर नगर, गुरुदत्त नगर, मेहरे नगर, शंकर नगर, बांबू वाडी, सरोदे शाळा परिसर, खडकी परिसरातील काही भाग जलमय झाला. पाऊस रात्री झाला तसेच अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

जिल्ह्यातील काही भाग जलमय

गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने 27 जुन रोजी रात्री जोरदार हजेरी लावली. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले. नाल्यांची साफसफाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी जोरदार पावसामुळे नाले तुडूंब भरून वाहिल्याने रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी साचले. पावसाचा जोर कमी न झाल्याने मोकळ्या जागा, सखल भाग जलमय झाला होता. पार्वती नगर, गुरुदत्त नगर आदी भागात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे काही प्रमाणात नुकसानही झाले. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे जीवन विस्कळीत झाले आहे. तीन चे चार फूट पाण्यातून नागरिकांना जाणे-येणे करावे लागत आहे. दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यास पाणी ओसरले जाईल. मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावल्यास या भागातील नागरिकांच्या घरात पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता आहे.

नवीन भागा नाल्या कच्च्या

शहरात अनेक भागात नवीन ले-आऊट पडले आहेत. या लेआऊट मध्ये पक्क्या तसेच कच्च्या नाल्या आहेत. मात्र संपूर्ण भागातील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.