आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमान्य नगरतील जलकुंभाचा पाणीपुरवठा 2 दिवस ठप्प:जलकुंभावर स्काडा अ‍ॅटोमेशनचे काम केले जाणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुने शहरातील लोकमान्य नगर भागातील जलकुंभावर शुक्रवारी दि. 6 रोजी स्काडा अ‍ॅटोमेशनचे काम केले जाणार आहे. हे काम दोन दिवस चालणार असल्याने या जलकुंभावरुन विविध भागांना होणारा पाणी पुरवठा दोन दिवस ठप्प राहणार आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासा बद्दल पाणीपुरवठा विभागाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

शहरात गेल्या काही दिवसापासून विविध जलकुंभाचा पाणीपुरवठा या-ना-त्या कारणाने विस्कळीत होत आहे. यापूर्वी 25 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातील 600 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने आठ जलकुंभाचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. तर 65 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील नेहरु पार्क येथील जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने या जलकुंभाचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. तर आता 65 एमएलडी वरील जुने शहरातील लोकमान्य नगर भागातील जलकुंभावर स्काडा अ‍ॅटोमेशनचे काम केले जाणार आहे. हे काम शुक्रवारी सुरू केले जाणार असून शनिवारी हे काम पूर्ण होईल. त्यामुळे या जलकुंभातून ज्या-ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्या भागांना रविवारपासून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

काय आहे स्काडा अ‍ॅटोमेशन ?

स्काडा अ‍ॅटोमेशन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे जलकुंभ भरल्या नंतर मॅन्युअली व्हॉल्व बंद करण्याची गरज राहणार नाही. व्हॉल्व आटोमॅटेकली बंद होईल. त्याच सोबत सर्व जलकुंभ भरल्या नंतर जलकुंभातून होणारा पाणी पुरवठा देखील अ‍ॅटोमॅटीक पद्धतीने बंद होईल. तसेच जलकुंभाला झालेला पुरवठा, जलकुंभातून नागरिकांना झालेला पाणी पुरवठा आदींचा लेखा-जोखा ठेवता येणार आहे.

या भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत लोकमान्य नगर भागातील जलकुंभावरील लोकमान्य नगर, शिवसेना वसाहत, मारोती नगर, गुरुदेव नगर, अयोध्या नगर, मेहरे नगर, आश्रय कॉलनीचा काही भाग, गायत्री नगर, भवानी नगर, शारदा नगर, पार्वती नगर, जुना बाळापूर रोडचा काही भाग आदी भागांचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.

तुर्तास दर तिन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. याच जलकुंभातून गेलेली जलवाहिनी मंगळवारी फुटल्याने अनेक भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. आता स्काडा अ‍ॅटोमेशनच्या कामामुळे या भागाला सहा दिवसा नंतर तर शुक्रवारी ज्या भागाला पाणीपुरवठा होणार होता, त्या भागाला पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...