आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासन अखेर दक्ष:पश्चिम झोनमधील 34 अवैध नळजोडण्यांचा पाणी पुरवठा केला खंडीत, पाणी पुरवठा विभागाची कारवाई

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पश्चिम झोन अंतर्गत म्हसोबा मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तसेच संदीप बावस्कर यांच्या घराजवळील 34 अवैध नळजोडण्याचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान नागरिकांनी आपल्या अवैध नळजोडण्या वैध करुन घ्याव्यात, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शहरात अवैध नळजोडणी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. अवैध नळजोडणी शोधल्या नंतर नळजोडणीचा पाणी पुरवठा खंडीत केला जात आहे. पश्चिम झोनमध्ये लोकमान्य नगर जलकुंभावरुन पाणी पुरवठा होणाऱ्या शिवसेना वसाहतीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ पिव्हिसी पद्धतीच्या 4 इंची जलवाहिनीवर 34 नळजोडण्या अवैध आढळून आल्या. विशेष म्हणजे ज्या जलवाहिनीवरुन अवैध नळजोडण्या घेण्यात आल्या, त्या जलवाहिनीचा पाणी पुरवठाच खंडीत करण्यात आला. त्याच बरोबर अवैध नळजोडण्यांवरही कारवाई करण्यात आली.

थकीत पाणीपट्टीचा भरणा

ही कारवाई मनपा झोन कंत्राटदार पुरुषोत्तम गुंडवाले यांच्या मार्फत कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, तुषार टिकाईत, विभागीय फिटर पद्माकर गवई, लोकमान्य नगर जलकुंभाचे फिटर सुधीर ढुके, संतोष पाचपोर, नागनाथ मोरे, धनराज पातोंड, गणेश घोडके आदींनी केली. दरम्यान ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडण्या आहेत, त्यांनी नळजोडण्या वैध कराव्यात तसेच ज्या नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत आहे, त्यांनी थकीत पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...