आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पुरवठा खंडीत:अकोला शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला एक्स्प्रेस फिडरच्या विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळली

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या एक्स्प्रेस फिडरच्या विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने 20 ते 22 तासापासून वीज पुरवठा खंडीत असल्याने संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.

मागील दोन ते तीन दिवसापासून शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पिकांचे नुकसान झाले असताना मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच विद्युत तारांवर झाडे कोसळ्याने वीज पुरवठा खंडीत झाला. महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला एक्स्प्रेस फिडरने वीज पुरवठा केला जातो. पिंजर ते कंझरा या दरम्यान तसेच बार्शिटाकळी ते महान या दरम्यान एक्स्प्रेस फिडरच्या विद्युत वाहिनीवर झाडे पडल्याने एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा रविवारी दि. 9 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता बंद झाला.

पहाटे दोन वाजे पर्यंत अधुन-मधुन वीज पुरवठा सुरु होत होता तसेच खंडीत होत होता. मात्र पहाटे दोन वाजल्या पासून बंद झालेला विद्युत पुरवठा सायंकाळी सहा वाजे पर्यंत सुरु झाला नव्हता. जलशुद्धीकरण केंद्रातून 65 एमएलडी आणि 25 एमएलडी क्षमतेच्या दोन केंद्रातून पाणी पुरवठा होतो. हे दोन्ही केंद्रातून होणारा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. वीज पुरवठा रात्री उशिरा पर्यंत सुरु न झाल्यास पाणी पुरवठा दोन दिवसाने पुढे ढकलला जावू शकतो.

उरवठ्यात पुरवठा

एकीकडे जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहरातील 35 जलकुंभाचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान हरिहरपेठ भागात नालीचे बांधकाम करताना जेसीबी मशिनमुळे लोकमान्य नगर, जोगळेकर प्लॉट भागातील जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाली. त्यामुळे या जलकुंभाचा पाणी पुरवठा विलंबाने सुरु होण्याची शक्यता आहे.