आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉल्व्हची दुरुस्ती‎:तीन जलकुंभातून आज होणार‎ विविध भागांना पाणीपुरवठा‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वितरण प्रणालीवरील ४५० आणि‎ ४०० मिमी. व्यासाचा व्हॉल्व्ह‎ दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.‎ परिणामी तीन जलकुंभांवरून‎ शुक्रवारी विविध भागांना पाणी‎ पुरवठा केला जाणार आहे.‎ शिवनगर भागातील दोन‎ जलकुंभांना महान येथील २५‎ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण‎ केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो.‎ तर शिवनगर भागातील जलकुंभातून‎ आश्रय नगर भागातील जलकुंभाला‎ पाणी पुरवठा केला जातो.

बुधवार, १‎ फेब्रुवारी रोजी शिवनगर‎ जलकुंभाच्या वितरण प्रणालीवरील‎ व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने शिवनगर‎ येथील दोन तसेच आश्रय नगरमधील‎ एक अशा तीन जलकुंभातील पाणी‎ पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात‎ आला होता. तर दुसरीकडे व्हॉल्व्ह‎ दुरुस्तीचे काम तातडीने सुरू‎ करण्यात आले होते. व्हॉल्व्ह‎ दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण झाल्याने‎ या तीन जलकुंभावरील पाणी पुरवठा‎ पूर्वपदावर आला आहे.‎

शुक्रवारी या भागाला पाणीपुरवठा
शिवनगर भागातील दोन जलकुंभातून वानखडे नगर,‎ गुलजारपुरा, फडके नगर, खैर महंमद प्लॉट, नेहरू‎ नगर झोपडपट्टी, गौसीया चौक, ज्ञानेश्वर नगर,‎ फुकटपुरा आदी भागाला तर आश्रय नगर जलकुंभातून‎ आश्रय नगर, मेहरे नगर, लक्ष्मी नगर, सरस्वती नगर,‎ गुरुदत्त नगर, अंबिका नगर आदी भागाला शुक्रवारी‎ पाणी पुरवठा होईल.‎

बातम्या आणखी आहेत...