आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपुर्णातून विसर्ग बंद:मोर्णा, निर्गुणा या मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्प तुडूंब; वान प्रकल्पातून विसर्ग सुरू

प्रतिनिधी । अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पातून विसर्ग सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पही ओसंडून वाहत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे ३१ जुलै रोजी दरवाजे उघडण्यात आले होते. ३ ऑगस्ट रोजी हे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र ४ ऑगस्टला प्रकल्पाचे दहाही दरवाजे उघडण्यात आले. हे उघडलेले दरवाजे ६ ऑगस्टला रात्री आठ वाजता बंद करण्यात आले. दरम्यान, वान प्रकल्पाचे ५ ऑगस्ट रोजी दोन दरवाजे सायंकाळी पाच वाजता उघडण्यात आले. प्रकल्पात येणारा फ्लो वाढत राहिल्याने ६ ऑगस्ट रोजी चार दरवाजे उघडून विसर्ग वाढवण्यात आला. हा विसर्ग वृत्त लिहेपर्यंत सुरुच होता.

एकीकडे मोठ्या प्रकल्पातून विसर्ग सुरु असताना जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा, दगड पारवा या प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाने मोर्णा, विद्रुपा, वान, पूर्णा आदी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काटेपूर्णातून ४१ दलघमी विसर्ग

काटेपूर्णा प्रकल्पातून या महिन्यात ४१ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला. या सोडलेल्या पाण्यातून शहराला पावणे दोन वर्ष पाणी पुरवठा करता आला असता. तर वान प्रकल्पातून ६९.१५ घनमिटर प्रतिसेकंद (६९ हजार १५० लिटर प्रतिसेकंद) विसर्ग सुरु आहे. त्यामुळे ताशी २४ कोटी ८९ लाख ४० हजार लिटर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

मोर्णा, विद्रुपा नदी दुथडी भरुन

दगड पारवा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.तर मोर्णा प्रकल्प ओसंडून वाहात आहे. त्यामुळे विद्रुपा आणि मोर्णा नदी दुथडी भरुन वाहात आहे.

प्रकल्पातील जलसाठा असा

- काटेपूर्णा - ८६.३५ - ७०.५१ दलघमी- ८३.१३ टक्के

- वान - ८१.९५ - ५८.९० दलघमी- ७२.८१ टक्के

- मोर्णा - ४१.४६ - ४१.४६ दलघमी- १०० टक्के

- निर्गुणा - २८.८५ - २८.८५ दलघमी - १०० टक्के

- उमा - ११.६८ - १०.२४ दलघमी - ८७.६७ टक्के

- दगड पारवा - ९.०१ दलघमी - ८८.४२ टक्के

बातम्या आणखी आहेत...