आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआला टोला:आम्ही सकाळी 6 पासूनच कामाला लागतो, मंत्री अब्दुल सत्तारांचा महाविकास आघाडीला टाेला

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सकाळी ६ पासूनच कामाला सुरुवात हाेत असून, हाच शिंदे-फडणवीस यांचे सरकार आणि महाविकास आघाडीच्या सत्तेतील फरक असल्याचा टाेला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी अकाेल्यात आघाडीच्या नेत्यांना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामातील पद्धत लक्षात घेता अनेक जण आमच्याच संपर्क असल्याचा दावाही त्यांनी पत्रकारांशी बाेलताना केला.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले हाेते. यावर अकाेला दाैऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तार यांनी पलटवार केला. राकाँचेच नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला.

फडणवीस यांच्या कामाचे मूल्यमापन करूनच अनेक जण आमच्या संपर्कात असून दाेन महिन्यात दिसून येईल, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. िवस्ताराबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...