आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअप्रभावी पद्धतीने तण नियंत्रण हे कपाशी उत्पादनात घट होण्याशी संबंधित मुख्य घटकांपैकी एक आहे. खरीप हंगामात विदर्भात कपाशीची एकूण लागवड क्षेत्राच्या ४०-४५ टक्के क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. खरीप हंगामात शेतात वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे पिकांना अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते. तसेच तणांची पिकांबरोबर हवा, जागा व सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत स्पर्धा होते. ही स्पर्धा प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात (पेरणीनंतर २०-६० दिवसांपर्यंत) महत्त्वाची असते, उत्पादनातील संभाव्य नुकसानीमुळे जे ७४-८९% पर्यंत असू शकते. वरील कालावधीनंतर पीक जरी तणमुक्त ठेवले तरी उत्पादनात झालेली घट भरून येऊ शकत नाही. यामुळे पिकांच्या संवेदनक्षम कालावधीनुसार योग्य वेळी व पद्धतीने तणव्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने दिला आहे.
डॉ.विकास गौड, कृषि विद्यावेत्ता, अ.भा. स. तणव्यवस्थापन प्रकल्प व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रकाश घाटोळ यांनी माहिती दिली की, पिकांचे उत्पादन कमी करण्याव्यतिरिक्त, तणांमुळे इतर समस्या उद्भवू शकतात, जसे की धान्याची गुणवत्ता कमी करणे, काढणी दरम्यान अडचण निर्माण करणे आणि कीटक आणि रोगांचे पर्यायी आधार वनस्पती म्हणून काम करणे. सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगांसाठी पर्यायी आधार वनस्पती म्हणून तणांची भूमिका आणि त्यांचा लागवडीतील हस्तक्षेप यामुळे उत्पादन खर्च जास्त होतो.
यावर एकात्मिक तणव्यवस्थापन अमलात आणल्यास तणांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. शेताची उत्तम मशागत, संतुलित खतांचा वापर, वाणाची निवड, पेरणीची वेळ, रोपांची निर्धारित संख्या, डवरणी, निंदन आणि पीक फेरपालट यासारख्या मशागतीय पद्धती पीक वाढीला फायदा होण्यासाठी केल्या पाहिजेत ह्या बाबी कटाक्षाने पाळल्या गेल्या तर अपेक्षित दर्जाचे तण नियंत्रण शक्य होते. एकात्मिक तण व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना तणनाशकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि तणनाशक-प्रतिरोधक झाडांची निर्मिती थांबवावी करिता एकात्मिक तणव्यवस्थापन पद्धतीचा दृष्टिकोन प्रेरित झाला.
तणनाशकाद्वारे कापशीतील तणव्यवस्थापन
उगवणपूर्व - पेंडीमिथालीन ३८.७ % सी.एस प्रति १० लिटर पाण्यासाठी ३० ते ३५ मिली. उगवणपश्च्यात - २० ते ३० दिवसांचे असतांना - क्विझ्यालोफोप इथाइल ५% ई.सी प्रति १० लिटर पाण्यात २० मिली. रुंदपानी तणे असल्यास पीक ३० ते ४० दिवसांचे असताना - ‘पायरीथिओब्याक सोडीयम’१०% ई.सी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.