आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी:श्री संत भास्कर महाराज पालखीचे शहरात स्वागत;‎ बार्शीमार्गे 5 जुलैला पोहोचणार श्रीक्षेत्र पंढरपुरात‎

अकोला‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन ‎ ‎ महाराज यांचे शिष्य श्री संत भास्कर ‎ ‎ महाराज व संत वासुदेवजी महाराज ‎ ‎ यांच्या पालखी सोहळ्याचे‎ आयोजन करण्यात आले आहे. ७‎ जून रोजी अकोट तालुक्यातील श्री‎ क्षेत्र अकोली जहागीर येथून ‎ ‎ टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय ‎ ‎ वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणी व‎ श्री संत भास्कर महाराज यांची‎ पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली‎ आहे. सोमवारी, १३ जूनला पालखी‎ अकोला शहरात मुक्कामी होती.‎ पालखी सोहळ्याचे अध्यक्ष‎ अशोक महाराज जायले व‎ शुभांगीताई जायले यांनी विधीवत‎ पूजन करून पालखीचे प्रस्थान‎ झाले. अकोला जहागीर येथील‎ दिवठाण, अकोट, श्री संत‎ वासुदेवजी महाराज वैष्णवी ज्ञान‎ मंदिर वडाळी सटवाई, वेताळ बुवा‎ मंदिर वारुळा, करोडी मार्गे पालखी‎ ११ तारखेला अकोल्यात पोहोचली.‎ संत गजानन महाराज मंदिर देशमुख‎ फैल, रामदास पेठ, गजानन महाराज‎ मंदिर सहकार नगर येथील‎ मुक्कामानंतर पालखी सोमवारी, १३‎ जूनला पुढील प्रवासासाठी निघाली.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ कौलखेड गांधीनगर स्थित शंकरराव‎ कडू यांच्याकडे दुपारी भोजन घेऊन‎ संध्याकाळी पालखी सोहळा‎ मुक्कामाची व्यवस्था माजी‎ राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या‎ आश्रमात होती. मंगळवारनंतर पुढे‎ खोतवाडी, म्हैसपूर, चिखलगाव‎ मार्गे पालखी पातुर नि तेथून पुढील‎ प्रवासाला निघणार आहे.‎ पालखी सोहळ्याचे संचालन‎ मोहन महाराज रेळे करीत आहेत.‎ सुदाम महाराज आगरकर, मंगेश‎ ठाकरे, माऊली डांगरो, अवधूत‎ थोरवे, सुरेश मानकर, कन्हैया‎ डिक्कर, आत्माराम वाकोडे,‎ नागोराव चौखंडे, शरद खंडारे,‎ अक्षय सोळंके, वामनराव पुंडकर,‎ प्रकाश तायडे, शंकरराव बोर्डे,‎ प्रवीण डिगोळे, गुणवंतराव पागृत,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ श्याम गायगोले, सुनिल नारे,‎ विठ्ठलराव गावंडे, शिवाजी नागरे,‎ सुनील झाडोकार, दिलीप‎ डिंगणकर, सुभाषराव पुंडकर, शिवा‎ मोहोड यांच्यासह अनेकजण सेवा‎ प्रदान करणार आहेत. अशी माहिती‎ संस्थापक अध्यक्ष अशोक महाराज‎ जायले व व्यवस्थापक भगवंतराव‎ पाटील गडम यांनी दिली आहे.‎ हा आहे मार्ग : दोन वर्षात‎ कार्यक्रमांवर अनेक मर्यादा आल्या‎ होत्या. त्यामुळे यंदा मोठ्या‎ उत्साहात ठिकठिकाणी पालखीचे‎ स्वागत होत आहे. वाशीम, हिंगोली,‎ परभणी, औढानागनाथ, परळी,‎ अंबेजोगाई, कळंब, हासेगाव,‎ बार्शी, वडसिंगे, आष्टीमार्गे ५‎ जुलैरोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर‎ येथे पोहोचणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...