आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Welcoming The Procession With Rangoli And Flower Showers Between Rajarajeshwar Temple And Birla Ram Temple. Collective Ramraksha Recitation, Lathi Kathi Training Attracted Attention | Marathi News

नवचैतन्याची गुढी…:राजराजेश्वर मंदिर ते बिर्ला राम मंदिर दरम्यान रांगोळ्या, पुष्पवर्षावाने यात्रेचे स्वागत. सामूहिक रामरक्षा पठण, लाठीकाठी प्रशिक्षणाने वेधले लक्ष

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढोल ताशाचा गजर, चौकाचौकात काढलेल्या सुंदर रांगोळ्या, डिजेवर घुमणारा श्रीराम नामाचा जप, रस्त्यावर फडकणाऱ्या भगव्या पताका, पुष्पांचा वर्षाव अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या हिंदू नववर्ष बाइक यात्रेचे अकोलेकरांनी स्वागत केले. राजराजेश्वर मंदिरातून सकाळी ७ वाजता शोभायात्रा निघाली. यात्रेचा समारोप बिर्ला राम मंदिरामध्ये झाला. कोरोनाची मरगळ झटकून निघलेल्या शोभायात्रेमुळे शहर चैतन्यमय झाले होते.अकोल्यात अनेक वर्षांपासून दरवर्षी संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त बाइकरॅली काढण्यात येते.

शनिवारी काढलेल्या शोभायात्रेत महिला, तरूणी, युवक आणि पुरूष सहभागी झाले होते. सर्वप्रथम रामरथाचे पूजन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर यात्रेचा प्रारंभ झाला.शोभायात्रा श्री राज राजेश्वर मंदिरातून निघून जयहिंद चौकमार्गे काळा मारोती मंदिर, सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर, जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, पंचायत समिती समोरुन, राणी सतीधाम मंदिर, जुना राधाकिसन प्लॉटमधील गुरुद्वारा, माहेश्वरी भवन, मेन हॉस्पिटलमार्गे, अशोक वाटिका, बस स्टँड चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेकलेस रोडवरून सिव्हिल लाइन्स चौक, जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राऊतवाडी मार्गे, जठारपेठ चौक, सातव चौक नंतर यात्रेचा समारोप सामूहिक रामरक्षा पठण व महाआरतीने बिर्ला राम मंदिर येथे झाला.

शोभायात्रेच्या आयोजनात समितीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, कार्याध्यक्ष प्रा. नितीन बाठे, मनीष अग्रवाल, संयोजक महेश जोशी, संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, शरद वाघ, स्वानंद कोंडोलीकर, मीनाक्षी आपोतीकर, सोनल ठक्कर, रश्मी कायंदे, समीर थोडगे, नीलेश देव, हेमेंद्र राजगुरू, स्वप्नील बोरकर, प्रशांत पाटील, सुनील पसारी, राम मोरगावकर, गजानन घोंगे, बबलू जोशी, पवन केडीया आदींचा पुढाकार होता.

हे राहिले प्रमुख आकर्षण
स्वागत यात्रेच्या मार्गावर चौकचौकात रांगोळ्या, यात्रा मार्गावर भगव्या पताका, भगवे ध्वज लावले होते. भगवान श्रीराम रथ, मंगलवेश, पारंपरिक वेश परिधान केलेले स्त्री, पुरुष, बुलेटधारी महिला, बिर्ला राम मंदिर येथे सेल्फी पॉइंट आणि ठेका धरायला लावणारे संकल्प ढोल पथकाचे वादन यात्रेचे आकर्षण ठरले.

विविध व्यक्ती आणि संघटनांकडून स्वागत
आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावकर, पवन केडिया, रमेश बजाज, माहेश्वरी समाज ट्रस्ट, श्री गुरूद्वारा प्रबंधन समिती, डॉ. अभय पाटील, विजय जयपिल्ले, गुजराती समाज ट्रस्ट, जयहिंद चौकात अशोक ओंळबे व ओमप्रकाश सावल, उषा विरक, बुद्ध महासभा अकोला, रामेश्वर फुंडकर, अनुप धोत्रे, आशिष पवित्रकार, सागर शेगोकार, जैन मंदिर ट्रस्ट, ब्राह्मण महासंघ अकोला, नीलेश देव फाऊंडेशन, राष्ट्रसेविका समिती, हरिष आलिमचंदानी, सिंधी समाज महिला मंडळ आदींनी यात्रेचे विविध मार्गावर स्वागत केले.

महिलांची निघाली रॅली, शोभायात्रेत ‘जय श्री राम' चा जयघोष
संस्कृती संवर्धन समितीतर्फे राजराजेश्वर मंदिरातून निघालेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेने शहरात चैतन्य निर्माण झाले. या यात्रेत महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी चौका-चौकात नृत्य, जयघोष केला. महाआरती, पूजन, प्रसादाने शोभायात्रेची बिर्ला राम मंदिर येथे सांगता झाली. याप्रसंगी सामूहिक रामरक्षा पठण झाले. बिर्ला राम मंदिरात महिलांनी भगव्या पताका हाती धरून रिंगण केले. ‘जय जय…राम राम..राम’ गाण्यावर महिलांनी ताल धरला. सेल्फी पॉइंटवर अनेकांनी फोटो घेऊन नववर्ष स्वागताच्या आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या.

बातम्या आणखी आहेत...