आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचे हाल:बंद पॅसेंजर गाड्या कधी होणार सुरू; खा. संजय धोत्रे यांची भुसावळ मंडळाच्या व्यवस्थापकांकडे विचारणा

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. त्या कधी सुरू होतील, अशी विचारणा माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांनी भुसावळ मंडळाच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.

मध्ये रेल्वेच्या भुसावळ विभागातून नागपूर व वर्ध्यासाठी पॅसेंजर गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे विदर्भातील सर्वसामान्यांना प्रवासाची सुविधा मिळत होते. मात्र, कोविड काळात या गाड्या बंद कराव्या लागल्या. आता हळूहळू रेल्वेने सर्वच गाड्या नियमित वेळापत्रकानुसार चालविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पॅसेंजर गाड्यांबाबत निर्णय घेण्यात आला नाही. पॅसेंजर गाड्या सुरू न झाल्यामुळे परिणामी इतर गाड्यांवर प्रवाशांची नाहक गर्दी होत आहे. व्यस्त असलेल्या मार्गावर पॅसेंजर गाड्या सुरू करून प्रवाशांना सुविधा देण्यात यावी, अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली आहे.

प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

पॅसेंजर गाड्यांची तिकीट कमी आहेत. त्या तुलनेत आरक्षित गाड्यांच्या तिकीट चौपट असतात. शिवाय सध्या बुकिंग शिवाय जनरलमध्येही प्रवास करता येत नाही. यामुळे तत्काळ कुठे जायचे असल्यास एसटीशिवाय पर्याय नाही. एसटी भाडे पॅसेंजर गाड्याच्या तुलनेत प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे या गाड्या सुरू करण्याची मागणी होतेय.

या गाड्यांची आहे प्रतीक्षा

गाडी क्रमांक 11394 - वर्धा-भुसावळ

गाडी क्रमांक 11395 - भुसावळ-वर्धा

गाडी क्रमांक 11385 - नागपूर-भुसावळ

गाडी क्रमांक 11386 - भुसावळ-नागपूर

बातम्या आणखी आहेत...