आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्भुत:कोण म्हणतं एका हाताने टाळी वाजत नाही ? म्हण बदलवणारा अकोल्यातील अमोल; 3 महिन्यांचा सराव

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उजवा हात कोपऱ्यापासून सरळ रेषेत ठेवल्यानंतर हाताचा पंजा तळव्याकडे झुकवला जातो आणि शेवटी तळव्याच्या शेवटी पंजा आदळतो अन‌् एका हातानेच टाळी वाजते....

दिसायला हे सरळ सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात तितकं सोपंही नाही.. "वर्ल्ड रेकॉर्ड््स इंडिया' या संस्थेत "फास्टेस्ट वन हँड क्लॅपिंग इन अ मिनिट' हा विक्रम नोंदवणारे अमोल अनासने यांनी एका हाताने एका मिनिटात ३०० पेक्षा अधिक टाळ्या वाजवण्याचा विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या या अद्भुत प्रवासाची सुरुवात खरं तर अपंग मामा मोहन रत्नपारखी यांच्या प्रेेरणेतून सुरू झाली. अमोल सांगतात, कोणत्याही कार्यक्रमात बाकीचे सारे जण दोन्ही हाताने टाळ्या वाजवून दाद देत तेव्हा मामा मात्र एक हात स्वत:च्या मांडीवर आपटून दाद देत असत. त्या वेळीच आपण एका हाताने टाळी वाजवून दाखवू हा निश्चय त्यांनी केला आणि सुरू झाला एका हाताने टाळी वाजवण्याचा प्रवास.

यासाठी कोणतीही आर्थिक गरज नव्हती. गरज होती ती केवळ जिद्द, आत्मविश्वासाची. मामासोबत जगात अनेक लोकांना एकच हात आहे, त्यांना टाळी वाजवता येत नाही. पण आपण त्यांच्यासमोर ही बाब सिद्ध करू की, एका हाताने टाळी वाजवता येते. त्यामुळे अमोल अनासनेे यांनी वयाच्या १६ वर्षी एका हाताने टाळी वाजवण्यास प्रारंभ केला. प्रारंभीचे काही दिवस एका हाताच्या टाळीचा आवाज अत्यंत कमी यायचा. मात्र त्याचा सातत्याने सराव केला आणि तीन महिन्यांच्या सरावानंतर एका हाताने टाळी वाजली. तेथून सतत सराव सुरू ठेवला. आज एका फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या अमोल अनासने यांनी एका हातानेच टाळी वाजवण्याचे अनेक विक्रम त्यांच्या नावावर नोंदवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...